शब्द शब्द रचताना
वेध लागले शब्दांचे
त्यांची गुंफली माळ
वेड लागले कवितेचे….1
भाव मनाचे शब्दात दाटले
मनात होते ते शब्दात रचले
शब्द वाटे प्रिय मला
शब्द शब्द शब्दात माळले…..2
ध्यास लागला कवितेचा
भंडार त्यात शब्दांचा
भावना झाल्या शून्य
आधार मला कवितेचा…..3
त्याच्या माझ्या प्रेमाला
कवितेत मांडले
पण कळले नाही त्याला
भाव माझ्या कवितेतले……4
सौ. वैजयंती विकास गहूकर
योगा टीचर जिल्हा. चंद्रपूर

