कविता मनाचा भाव
सुखद विचारांचा गाव
प्रत्येक वळणावर
मिळालेला अनुभवांचा ठाव।।१।
कधी हसरे मोती
कधी तुटणार नाती
तरीही जीवन जगण्याची
कविताच प्रेरणा देती।।२।।
कविता कवीची जान
तिला शब्दांचे नसे भान
फक्त कवितांसाठी होतो
कवीचे जीवन कुर्बान।।३।।
कविता कवीची साथी
सुख दुःखात साथ देती
नात्यामधील सेतू बनून
ती नाती जपत जाती।।४।।
प्रा.समिंदर शिंदे, लातूर

