19 वर्षानंतर माजी विद्यार्थी-शिक्षकांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न…

0
370

स्नेहबंधांचा सुंदर सोहळा,
हास्य आनंद फुलवणारा ||
आपुलकीची ही भेट अनोखी,
सर्वांना एकत्र बांधणारा |

पोंभूर्णा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिघोरी – जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी ता. पोंभूर्णा जि. चंद्रपूर येथे दिनांक 22 मार्च 2025 रोजी शैक्षणिक सत्र 2006 ते 2009 या वर्षात शिक्षण घेतलेले विद्यालयीन वर्गमित्र – मैत्रीणी तब्बल 19 वर्षानंतर ची अविस्मरणीय भेट म्हणून स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष,पदाधिकारी, माजी शिक्षक मान्यवर व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित सदस्यांनी एकत्र येऊन आनंद लुटला.
स्नेहमिलन सोहळ्याचे अध्यक्ष मा. श्री. विनोदभाऊ अहिरकर अध्यक्ष जनसेवा ग्रामीण विकास संस्था तथा माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, तर प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री मनोज अहिरकर मुख्याध्यापक जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी, श्री विद्याधर बुर्रीवार सर, महिला व बालकल्याण विस्तार अधिकारी एटापल्ली, श्री साईनाथ चिमुरकर सर, प्राध्यापक शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पेरमिली ,श्री अनिल पोटे सर, प्राध्यापक शासकीय माध्यमिक शाळा जिमलगटा, श्री रोशन थोरात सर प्राध्यापक विश्वशांती विद्यालय मारोडा, श्री विपिन वाकडे सर ग्राम विकास अधिकारी कोसंबी, सौ मुरकुटे मॅडम प्राचार्य जनसेवा कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव ,श्री संजय अहिरकर सर स. शि. जनसेवा विद्यालय दिघोरी ,श्री उंदीरवाडे सर , कु. खडसंग मॅडम , कु. चव्हाण मॅडम जनसेवा कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव, सौ.बुर्रीवार मॅडम, सौ. चीमुरकर मॅडम, सौ पोटे मॅडम, राकेश गुनशेट्टीवार, विलास देहारकर ,लखन गेडाम ,प्रवीण फुलझेले हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे मान्यवर यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर स्वागत गीत, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व मनोगताच्या माध्यमातून सोहळ्याची रंगत वाढली. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल कौतुक व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षक तसेच संस्थेचे अध्यक्ष यांचे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन तसेच जनसेवा शाळेच्या वतीने सुद्धा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे माजी शिक्षक यांचे सुद्धा शाळेच्या वतीने आकर्षक भेट वस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञान ज्ञानाचे पवित्र कार्य करण्यासाठी आपण जनसेवा शाळेचे बीज रोपण केले आणि या बीजाचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर करण्यासाठी माजी शिक्षकांनी मेहनत घेतली आणि अध्यापनाचे पवित्र कार्य करून सहकार्य केले असे संस्थेचे अध्यक्ष माननीय विनोद भाऊ अहिरकर यांनी आपल्या भावना मनोगतात व्यक्त केले. तसेच माजी शिक्षकांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेची पहिली बॅच घडवण्यामध्ये सर्व शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली असे प्रतिपादन केले.
जनसेवा शाळा ही आमच्या आयुष्याला घडविणारी आणि सन्मानाने जगण्याची दिशा देणारी शाळा ही आमच्या आयुष्यात लाभली असे मत माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थ्याकडून शाळेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
स्नेहमिलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश मशाखेत्री यांनी केले , प्रास्ताविक सविता अर्जुनकर आरेकर हिने केले तर आभार सपना शिंदे नरसापुरे हिने मानले. तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या घडवून आणण्यासाठी जगदीश मशाखेत्री , कोमल एनप्रेडीवार रक्षणवार, पंकेश पाल ,अनिता पाल वाकुडकर, संदिप झरकर, अविनाश गोहणे, अमोल अर्जुनकर, आशिष वाकडे, सुनिल मशाखेत्री, सरिला शेरकी, वृंदाताई लेनगुरे,कालेश्वर राजुरवार, राहुल पोटे, रुपाली अर्जुनकर, रिना रोहनकर, भाग्यश्री राजुरवार, ज्ञानेश्वरी रोहनकर बोबाटे, मोनिका निमसरकर उराडे, योगिता पोतराजे, अरुणा मोहुर्ले, व इतर वर्ग मित्र मैत्रीण यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना उत्तम भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. या स्नेहमिलन सोहळ्यामुळे आपसातील आपुलकी व स्नेहभाव अधिक दृढ झाला. आयोजकांनी सर्व सहभागी सदस्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
स्नेहमिलन सोहळा – एकत्र येऊया, आनंद साजरा करूया!
आपुलकीचे नाते, आनंदाच्या गाठी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here