चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने गृहमंत्री देवेंद्रजी फड़णविस व प्रशासनाला लेखी तक्रारीद्वारे मागणी
रोहिणी खोब्रागडे सहसंपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपुर – शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उप-मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात व्यंगात्मक गाणं बनवून त्यांची अपमानास्पद भाषेचा वापर करुन खालच्या पातळीवर बदनामी करण्याचे क्रूत्य व चारित्र्य मलिन करण्याचा प्रयत्न करित खिल्ली उडविणारे गाणं समाजमाध्यमावर ट्रोल करणाऱ्या कुणाल कामरा याला तात्काळ अटक करुन कायदेशीर कठोर कार्यवाही करण्याची चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने गृहमंत्री देवेंद्रजी फड़णविस, पोलिस स्टेशन रामनगरचे पोलिस निरीक्षक व प्रशासनाला लेखी तक्रारीद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी लेखी तक्रार शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी दिली तर महिला आघाडी चंद्रपुर जिल्हाप्रमुख मिनल आत्राम बल्लारपुर विधानसभा महिला संघटीका क्रिष्णाताई सुरमवार, युवासेना उप जिल्हाप्रमुख सुधीर राजगड कर, उप तालुकाप्रमुख विक्की महाजन, गुरुदास मेश्राम, उप महानगर प्रमुख विश्वास खैरे, विभाग प्रमुख अजय चौधरी, भद्रावती मा. नगरसेवक नाना दुर्गे, निखिल सुरमवार आदींची उपस्थिती होती.
व्यंगात्मक गीत गाणारा कुणाल कामरा यांने शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उप-मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या विरोधात व्यंगात्मक गाणं बनवून त्यांची अपमानास्पद भाषेचा वापर करुन खालच्या पातळीवर बदनामी करण्याचे क्रूत्य व चारित्र्य मलिन करण्याचा प्रयत्न करित खिल्ली उडविणारे गाणं समाजमाध्यमावर ट्रोल केल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनता आणि लाडक्या बहिणी यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून अशा बुद्धिहीन, निर्लल्ज, मुर्ख, अशिक्षित, कमअकली कुणाल कामरा याला तात्काळ अटक करुन कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा चंद्रपुर शिवसेना नाईलाजास्तव शिवसेना पद्धतिने आंदोलन करण्याचा इशारा व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल, असे लेखी तक्रारीत देण्यात आले.

