अहमदपूर प्रतिनिधी:- भीम आर्मीचे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे याचे नेतृत्वात नांदुरा खुर्द गावात अनेक दिवसापसून व आज तागायत चालू असलेल्या किसनराव देशमुख याचे शेतात अंतविधी केला जात होता. व आज रोजी ही त्याचं ठिकाणी अंत विधी केला जातो. याठिकाणी जाणे येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसून पावसाळ्याच्या दिवसात खूप त्रास होत असून या ठिकाणी जाणेसाठी रस्ता मागणीसह अनेक मूलभूत गरजा संदर्भात अहमदपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे तरी माननीय तहसीलदार साहेब/ मॅडम यांनी तत्काळ कार्यवाही करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
त्या खाली प्रमाणे मागणी केले आहेत
अनेक दिवसा पासून प्रलंबित असलेल्या नांदुरा खुर्द गावातील बौद्ध समाजासाठी सवतंत्र सम्शान भूमी बांधून देण्यात यावी
बौद्ध समाजाचे पूर्वीपासून व पारंपरिक अंतविधी संस्कार किसनराव देशमुख यांच्या शेतात आत्तापर्यन्त करण्यात आला आहे व या ठिकाणी सम्शानभूमी बांधून (सुशोभीकरण)करून बांधून देण्यात यावी.
बौद्ध व लमाणी सम्शानभूमिकडे जाण्यासाठी नदी करून जावं लागतं आहे तर त्या ठिकाणी पुल बांधून (बांधकाम) करून देण्यात यावे.
तसेच नदीचे खोलीकरण करून देण्यात यावे.
बौद्ध वस्तीत दिवा बत्ती /सोलार लाईट बसवण्यात यावे तसेच 10 पोल देण्यात रोवण्यात यावे.
गावाकऱ्यांसाठी स्वच्छ व शुद्ध पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून दोन आरो मशीन मोटार बसून देण्यात यावे डॉ बाबासाहेब आंबेडकर सास्कृतिक सभागृहसाठी जागा देण्यात यावी.
डॉक्टर च्या शेतापासून ते गावात जाणारा रस्ता दुरुस्त करून देण्यात यावे आशयाचे निवेदन भीम आर्मीचे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे याचे नेतृत्वात आज अहमदपूर चे तहसीलदार याचे कडे देण्यात आले या वेळी भीम आर्मीचे अहमदपूर तालुका अध्यक्ष अफसर भाई शेख,अझर पठाण हारुण चाऊस फय्याज शेख सलाउद्दीन शेख शाहरुख खान अतुल गवळे सुनिल गवळे सोमनाथ गवळे विशाल बनसोडे आदी पदाधिकारी निवेदन देते वेळी हजर होते.

