
आला सण पाडव्याचा
दारी बांधले तोरण
रूढी आणि परंपरा
यांचे करू या स्मरण।।१।।
गेले जुने ते दिवस
होते गोकुळ घरात
आपुलकी व जिव्हाळा
होता प्रत्येक मनात।।२।।
चैत्र पालवी फुटते
फुले निसर्ग सौंदर्याने
चला करू या स्वागत
नवं वर्ष आनंदाने।।३।।
सुख येईल जीवनी
यश मिळेल सर्वाना
चैत्र पाडव्याचा आला
सुख घेऊन महिना।।४।।
माझी मराठी अस्मिता
किती स्वरूप सूंदर
महाराष्ट्राची भूमीही
किती वाटे मनोहर।।५,।।
चैत्र पाडव्याला होवो
बरसात ही सुखाची
हीच मंगल कामना
आहे माझ्या ग मनाची।।६।।
प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे,लातूर















