प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुढी

0
67

आनंदाचे फुटून पालवी
फुलू दे मोहोर समाधानाचा.
सुखाच्या मारुन गाठी
-हास होऊ दे निरशेचा.

आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर
स्वप्नांना नवा बहर येऊ दे .
सद विचारांची शिदोरी
सदैव जवळ राहू दे .

इच्छा आणि आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे .
छोट्या मोठ्यांचा आशीर्वाद
सदैव पाठीशी राहू दे .

उत्कर्षाचे शिखरे
किर्ती रुपी उरावी .
कधी वळून वळून पाहताना
शिवबाची मूर्ती स्मरावी .

वेल आपल्या कीर्तीचा
गगनाला जाऊन भिडू दे .
आई भवानीच्या कृपेने
राज्य शिवबाचे पुन्हा येऊ दे.

आनंदाची करुण उधळण
सुखाची बरसात करू .
आजचा हा सोनेरी दिवस
गुढी उभारून साजरा करू .

पूर्ण होऊ दे सर्वांच्या
मनातील इच्छा .
गुढीपाडव्याच्या सर्वांना
खूप खूप शुभेच्छा.

सौ भारतीय वसंत वाघमारे
मंचर ता. आंबेगाव जि. पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here