खमनचेरु व आपापल्ली येथे अहेरी पोलिसांची कारवाई
तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक बा मिरालवार
8830554583
अहेरी – ३० मार्च तालुक्यात दोन वेगवेगवेगळ्या घटनांत गायींची कत्तल करून गोमांस विक्री करण्याच्या आरोपाखाली ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील आपापल्ली व खमनचेरू येथे शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे गायींची कत्तल करून गोमांस विक्री केले जाणार असल्याची माहिती अहेरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार आपापल्ली येथील एका शेतात गायीची कत्तल करताना चिंतलपेठ येथील विजय कोलेकर व त्याचे दोन साथीदार आढळून आले. या घटनेत पोलिसांनी विना नंबर प्लेटची दुचाकी जप्त केली आहे. दुसऱ्या घटनेत खमनचेरू येथील शेतात गायीची कत्तल करून गोमांस विक्रीकरिता काढताना ४ आरोपी पोलिसांना आढळून आले. यामध्ये फुलाबाई नानया गोलेटीवार, अमित नानाया गोलेट्टीवार, नितीन नारायण निष्ठरवार, सर्व रा. खमनचेरू, कैलास आशया लिंगमपल्ली, रा. पापणपेठ (तेलंगाना) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन्ही घटनांतील आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार करीत आहेत.

