prabodhini news logo
Home ठळक बातम्या ‘भोंसला मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून शिस्तबद्ध पिढीच्या निर्माणाचे कार्य’

‘भोंसला मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून शिस्तबद्ध पिढीच्या निर्माणाचे कार्य’

0
116

प्रशांत देशपांडे ब्युरो चीफ प्रबोधिनी न्युज नेटवर्क 8855997015

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंसला मिलिटरी स्कूल, नागपूर येथे ‘जनरल बिपिन रावत ऑडिटोरियम’चे उदघाटन आणि ‘डॉ. बाळकृष्ण शिवरामपंत मुंजे यांच्या पुतळ्या’चे अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या समाजाला पुन्हा गुलामगिरीत जावे लागू नये, समाजामध्ये सैनिकी मूल्ये रुजावीत तसेच शिस्तप्रिय पिढीचे निर्माण व्हावे यासाठी डॉ. बाळकृष्ण मुंजे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. याच सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भोंसला मिलिटरी स्कूलची स्थापना झाली. नागपूर येथे 1995 मध्ये स्थापन झालेली ही सैनिकी शाळा आज संपूर्ण मध्य भारतात सैनिकी शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्याबद्दलची आठवण सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जनरल बिपिन रावत यांच्याशी भोंसला मिलिटरी स्कूलच्या एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली होती. त्यावेळी सैन्यदलाशी संबंधित विषयांवर सखोल चर्चा झाली होती. जनरल बिपिन रावत यांचे सैन्यदलासोबत देशवासियांच्या मनात देखील आदराचे व प्रेमाचे स्थान होते. बलशाली भारतासाठी आज भोंसला मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून शिस्तबद्ध पिढीच्या निर्माणाचे कार्य सुरु असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी भारतीय लष्कराचे निवृत्त लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, भारतीय हवाई दलाचे निवृत्त उपप्रमुख एअर मार्शल शिरीष देव, भोंसला मिलिटरी स्कूलचे चेअरमन शैलेश जोगळेकर, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी नागपूर विभागाचे अध्यक्ष सूर्यरतन डागा, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी नागपूर विभागाचे सचिव राहुल दीक्षित व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here