शेवगाव पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी

0
38

2 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे, 4 मॅग्झीन, दोन स्कॉर्पीओ गाड्या व 11 मोबाईल असा एकुण 13,35,400 रु किंमतीचा मुद्देमाल सह 8 आरोपी जेरबंद

शेवगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक 3/4/2025 रोजी पहाटे 3/30 वाजताचे सुमारास पोनि समाधान नागरे सो यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पैठण तालुका संभाजीनगर येथून दोन स्कार्पिओ वाहनांमध्ये काही इसम हे शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे येणार असून सदर इसमांकडे गावठी बनावटीचे कट्टे आहेत अशी माहीती मिळताच पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस स्टेशनचे सपोनि सुंदरडे,सपोनि काटे, पोना 519 /आदिनाथ वामन, पोकॉ 03/शाम गुंजाळ, पोकॉ 829/राहुल खेडकर, पोकॉ राहुल आठरे, चा.पो.ना धायतडक,पोहेकॉ गोरे,सफौ वाघमारे व होमगार्ड अमोल काळे , शिदें,रवि बोधले यांना शेवगाव पोलीस स्टेशन समोरील क्रांती चौक या ठिकाणी बोलावून घेतले.सदर ठिकाणी नाकाबंदी करीत असताना आज रोजी पहाटे 5/00 वाजताचे सुमारास दोन स्कार्पिओ वाहन एम एच 16 AB 5454 व एम एच 17 ए झेड 4199 हे पैठण ते शेवगाव या रोडने क्रांती चौक या ठिकाणी येत असताना पोलीस स्टाफ यांनी सदरचे दोन्ही वाहने अडवली.दोन्ही वाहनांपैकी एम एच १६ ए बी 5454 या वाहनांमध्ये एकूण पाच इसम मिळून आले व MH 17 AZ 4199 या वाहनांमध्ये तिन इसम मिळून आले त्यावेळी आम्ही त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या वाहनाची झडती घेवुन MH 16 AB 5454 या वाहनात मिळून आलेल्या पाच इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता 1) अंकुश महादेव धोत्रे वय 24 वर्ष धंदा-मजुरी राहणार बोरगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर 2) शेख आकिब जलील वय 27 वर्षे धंदा -आरटीओ एजंट राहणार मुकुंद नगर इनाम मजेत अहिल्यानगर 3) सुलतान अहमद शेख वय 47 वर्ष धंदा ड्रायव्हर राहणार गोविंदपुरा अहिल्यानगर 4) दीपक ज्ञानेश्वर गायकवाड वय 25 वर्षे धंदा मजुरी राहणार शिवाजीनगर कल्याण रोड, अहिल्यानगर 5) मुक्तार सय्यद सिकंदर वय 40 वर्ष धंदा प्लंबर राहणार अहिल्यानगर तालुका अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर अशी सांगितली तसेच वाहन क्रमांक MH 17 AZ 4199 या वाहनात मिळून आलेल्या तीन इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता १) पापाभाई शब्बीर बागवान वय २७ वर्षे धंदा- मजुरी रा.वेस्टर्न सीटी श्रीरामपुर ता.श्रीरामपुर जि.अहिल्यानगर २) सोहेल जावेद कुरेशी वय २२ वर्षे धंदा- मजुरी रा.फातेमा हाऊसींग सोसायटी श्रीरामपुर ता.श्रीरामपुर जि.अहिल्यानगर.३) आवेज जुबेर शेख वय २८ वर्षे धंदा- मजुरी रा.मिल्लतनगर, वार्ड क्र.०१ श्रीरामपुर ता.श्रीरामपुर जि.अहिल्यानगर अशी सांगीतली. त्यानंतर आम्ही पोलीस स्टाफ यांनी मिळुन आलेल्या वाहनांपैकी एम एच 16 AB 5454 या वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनाचे ड्रायवर सीटच्या बाजुचे सीटच्या समोरील ड्रावर मध्ये एक गावठी कटटा दोन मॅगझीन व ०४ जिवंत राऊंड(काडतुस) मिळुन आले तसेच एम एच 17 एझेड 4199 या वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनाचे ड्रायवर सीटच्या बाजुचे सीटच्या पाठीमागे सिट कव्हरमध्ये एक काळया रंगाची हॅन्ड बॅग मिळून आली असता त्यामध्ये एक गावठी कटटा, दोन मॅगझीन व ०४ जिवंत राऊंड (काडतुस) मिळुन आले.सदर मिळुन आलेल्या अग्णीशस्त्राबाबत वाहनातील ईसमांना विचारना केली असता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही.तसेच सदर अग्णीशस्त्रा बाळगण्याचा कोणताही वैध परवाना त्यांचेकडे नसलेबाबत सांगीतले.त्यामुळे सदर ईसमांचे ताब्यात बेकायदेशिररित्या अग्णीशस्त्र मिळुन आल्याने आंम्ही सदर ईसमांची अंगझडती व वाहनाची झडती घेतली असता त्यांचे अंगझडतीत व ताब्यात खालील वर्णनाचा व किंमतीचा मुददेमाल मिळुन आला.सदरच्या कार्यावाहीतध्ये खालील प्रमाणे आरोपीच्या अंगझडतीमध्ये मुददेमाल मिळुन आला आहे.
1. 70,000 रु कि.चे देशी बनावटीचे दोन गावठी कटटे जु.वा.किं.अं.
2. 2,000 रु कि.चे देशी बनावटीचे चार मॅक्झीन जु.वा.किं.अं.
3. 400 रु किं.चे जिवंत राऊंड (काडतुस) 7.65 MM चे ०8 जिवंत राऊंड (काडतुस) जु.वा.किं.अं.
4. 500 रु कि.चा गावठी कटटा ठेवण्याठी बॅग जु.वा.किं.अं.
5. 52,500 रु कि.चे आरोपींच्या अंगझडतीमध्ये एकुण 11 मोबाईल मिळुन आले असुन सदर मो.बा.ची जु.वा.किं.अं.
6. 12,10,000 रु कि.च्या आरोपींच्या ताब्यातील 2 स्कॉर्पिओ गाडया जु.वा.किं.अं.
————————————-
13,35,400 /- एकूण किंमत
येणे प्रमाणे वरील मुद्देमाल दोन पंचाचे समक्ष जप्त करुन सदर आरोपी आरोपी म। यांचे विरुद्ध पोना 519 आदिनाथ तुकाराम वामन यांचे फिर्यादी वरुन शेवगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 309/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे दिनांक 03/04/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्यातील आरोपीत म। यांना अटक करण्यात आली असुन पुढीत तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक राकेश ओला सो अहमदनगर, मा.अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अहिल्यानगर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. समाधान नागरे, सपोनि सुंदरडे,सपोनि काटे,पोहेकॉ चंद्रकांत कुसारे,पोहेकॉ आबासाहेब गोरे,पोहेकॉ किशारे काळे,पोना आदिनाथ वामन, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ भगवान सानप,पोकॉ राहुल खेडकर,पोकॉ संपत खेडकर,पोकॉ राहुल आठरे,पोकॉ प्रशांत आंधळे,पोकॉ एकनाथ गर्कळ, चा.पो.ना धायतडक व होमगार्ड अमोल काळे,शिदें,रवि बोधले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुड्डु यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here