शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा लाड येथे शेतकरी उत्पन्न बाजार समिती मध्ये आविष्कार नाट्य महोत्सव आयोजित कार्यक्रमात प्रकाशदादा डहाके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाट्य महोत्सव साजरा करण्यात आला आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
विशेष अतिथी म्हणून शेगांव गजानन महाराज फेम दीपक नांदगावकर स्वामिनी मालिका कलाकार नीतेश ललित अमरावती ,, सिनेस्टार विशाल तराळ. हे महत्त्वाचे आकर्षण होते अविष्कार संस्थेचे अध्यक्ष अश्विन जगताप. यांनी कार्यक्रमाचे आयोजन नियोजन अतिशय सुरेख केले होते आणि गावातील प्रतिष्ठित लोकांची बरीचशी उपस्थित होते. आणि सर्वांनी सर्व सर्वांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले कारण यामध्ये कलाकारांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन प्रेरणा आणि चालना देण्याचं काम अश्विन करतोय हे घाटोळे सर बोलले आणि यापुढेही अशीच नाट्य ही चळवळ सुरू राहील आणि यासाठी हवी ती मदत करू अशे ही सर बोलले.
सोळा भजनी मंडळ यांनी आपली कला सादर केली भावपूर्ण भजन अतिशय सुंदर पेहराव करून सादरीकरण केले. आणि भजनी मंडळाचे परीक्षण ईहरे सर आणि फुकटे सर यांनी केले.
सायंकाळी अश्विन जगताप दिग्दर्शित उंच माझा झोका ग हे नाटकं कारंजा लाड मधील कलाकारांना घेऊन नाटक फारचं छान सादर केले. सर्व कलाकार सुंदर नि नाटयाशी साजेसा पेहराव करून पात्र उंच उंच वटविले हे विशेष…रसिक वर्गाला मंत्रमुग्ध केले.
गावातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. मला तर असं वाटलं की आज खरोखर लेखणीला योग्य असा सन्मान मिळाला आणि तो अश्विन जगताप यांनी दिला.
अतिशय थाटात अविष्कार नाट्य महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला..

