एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी एटापलीच्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या पटांगणावर एटापली महिला सांस्कृतिक कला महोत्सव तथा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर सत्कार सोहळा आम्ही सावित्रीच्या लेकी समूह एटापली यांच्या सौजन्याने आज 7 च्या सुमारास आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन नयन गोयल उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एटापली यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर सोनल ताई कोवे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष गडचिरोली हे होते तर कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून कुमारी तनुश्री धर्मराव बाबा आत्राम सिनेट सदस्य तथा राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष गडचिरोली, सारिका ताई गडपल्लीवार अहेरी विधानसभा कार्याध्यक्ष हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी, हेमंत गांगुर्डे तहसीलदार, आदिनाथ आंधळे गटविकास अधिकारी प्रणय तांबे मुख्याधिकारी नगर परिषद ठाकूर नीलकंठ कुकडे पोलीस निरीक्षक एटापल्ली प्रामुख्याने उपस्थित होते…

