सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तथा राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हा अध्यक्षा तनुश्रीताई आत्राम यांनी स्वीकारला पुरस्कार
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – गडचिरोली च्या हॉटेल लँडमार्क येथे “द मीडिया फाऊंडेशन” तर्फे National Awards for Excellence in Journalism राष्ट्रीय पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 2 एप्रिल रोजी करण्यात आले होते.
त्यानिमित्ताने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्याचा गौरव म्हणून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना गौरव चिन्ह बहाल करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी यांनी पुरस्कार स्वीकारला.या कार्यक्रमास पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, सिनेट अध्यक्षा तनुश्री आत्राम, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, अभियंता साखरवाडे, जयंतजी चौधरी, त्रिपाठी, “द मिडिया फाऊंडेशन संस्थापक ब्रम्हानंद तिवारी, मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ता ज्ञानेंंद्रजी विशवास, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे यांसारखे विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

