प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आष्टी: प्राचीन काळापासून झाडीपट्टीत स्थानिक जनतेचे रंजन व प्रबोधन करणारे लोकनाट्य दंडार आजही प्रचलित आहे. जय बजरंग बली दंडार मंडळ बेरlडी यांच्यासारख्य मंडळांच्या माध्यमातून शेकडो प्रयोग झाडीपट्टीत आजही दंडारीचे होतात लोकरंजन करणारे दंडार हे महत्त्वाचे नाट्य असल्याचे प्रतिपादन दंडार कलावंत दिनकर नामदेव सोनटक्के यांनी केले .ते वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित दंडार :लोकनाट्य या विषयावर बोलत होते.
वीस वर्षापासून दंडार या लोकनाट्यामध्ये विविध भूमिका करणारे विशेषत: स्त्रीपात्र, खलनायक, चरित्र, विनोदी अशा विविध भूमिका साकारणारे कलावंत दिनकर नामदेव सोनटक्के यांनी दंडार या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले होते. तर मराठी विभागप्रमुख डॉ.राजकुमार मुसणे, डॉ. गणेश खुणे,डॉ. भारत पांडे, डॉ. रवी शास्त्रकार, प्रा.रवी गजभिये, डॉ.शाम कोरडे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना मार्गदर्शक रंगकर्मी दिनकर सोनटक्के यांनी दंडार लोकनाट्याची उत्पत्ती, परंपरा, झाडीपट्टीतील नाटक आणि दंडार यातील फरक, दंडारचे वेगळेपण, नांदी आणि गण तथा आज सादर होत असलेल्या दंडारीचे विषय व सादरीकरण याविषयी साभिनय मार्गदर्शन केले. जय बजरंग बली दंडार नाट्य कलाकृती मंडळ चेक बेरडी या दंडार मंडळाच्या माध्यमातून वा दिवा लावला पोरीन नजर लागली संसाराला यासारख्या दंडारीचे तब्बल सत्तरपेक्षा अधिक प्रयोग यावर्षी केले आहेत. युवकांनी करियर म्हणून सुद्धा अभिनय क्षेत्राकडे वळण्याविषयी दिनकर सोनटक्के यांनी आवाहन केले.अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनी कलेची जोपासना, छंद, आवड या बरोबरच विद्यार्थ्यांनी कला आत्मसाथ करावी असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा .राजकुमार मुसणे यांनी केले तर उपस्थिताचे आभार तेजस्विनी मडावी हिने मानले.

