राघू मैनेचे काल छान
ऑनलाइन लग्न झाले
लग्नासाठी त्यांच्या मग
अवघे क्षितिजच आले।।१।।
लग्नाच्या क्षितिज घरी
नवरी बसली सजून
राघूचा एक सुद्धा sms
आला नाही अजून।।२।।
सर्व मंडळी लग्नाला
छान छान नटली
राघुला मात्र मैना
झटकीपट पटली।।३।।
लग्नामध्ये अक्षीदा
घेऊन आले फेसबुक
नवरीचा मात्र लग्नात
सूंदर दिसत होता लूक।।४।।
इन्स्टाग्राम फेसबुकने
सर्व लग्नाचा खर्च केले
अशा प्रकारे राघू मैनेचे
ऑनलाइन लग्न झाले।।५।।
सुरु झाला त्यांचा
Whatsappवर संसार
राघु मैनेला रोजच
भांडून भांडून बेजार।।६।।
गुगलवरून दोन पोरं
छान डाउनलोड केले
फेसबुक इन्स्टाग्राम
अशी नाव त्यांनी ठेवले।।७।।
राघू मैनेचा संसार आता
छान चालतो सुखात
Whatsapp रोज मग
करत असतात सुप्रभात।।८।।
प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे,लातूर

