मनसेचे मनोज तांबेकर जिल्हा अध्यक्ष रोजगार स्वयम रोजगार विभाग ची मागणी
मनसेने दिले चंदपुरा शहरातील सर्व बँकांना निवेदन
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महाराष्ट्रात आस्थापनामध्ये बँकांमध्ये संस्थांमध्ये मराठी भाषेचा वापर खूप कमी प्रमाणात केल्या जातात महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी भाषा येणे बंधनकारक आहे तरीही बँकांमध्ये परप्रांतीय कर्मचारी आहेत ज्यांना मराठी येतात पण ते मराठी बोलत नाही त्यामुळे बँकांमध्ये येणारा जो मजूर वर्ग असतो त्यांना हिंदी बोलता येत नाही त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो व बँकेतील कर्मचारी त्यांच्याशी खूप उद्धटपणे वागतात बँकेत येणाऱ्या ग्राहकांना स्पष्ट बोलतात मुझे मराठी आती नही तुमको हिंदी आती है तो बात करो त्यामुळे ज्यांना हिंदी येत नाही त्यांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो बँकेत येणाऱ्या कोणत्याही ग्राहकांना असा त्रास होऊ नये याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चंदपुर प्रत्येक बँकांना मराठी भाषा ही बँकांमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला आलीच पाहिजे त्याकरिता निवेदनामार्फत पत्र दिले आहे. ज्यांना मराठी भाषा येत नसेल त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व इथून चालते व्हावे महाराष्ट्रात राहून मराठी भाषा येत नाही हा मराठी भाषेचा अपमान आहे आणि तो अपमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही त्यामुळे सर्व आस्थापन बँका येथील कर्मचाऱ्यांना मराठी भाषा येणे बंधनकारक आहे आणि त्यांनी बँकेमध्ये मराठी भाषेचाच वापर केला पाहिजे यासंदर्भात निवेदन सादर केले निवेदन देते असताना उपस्तित.
मनोज ताबेंकर जिल्हा अध्यक्ष रोजगार स्वयम रोजगार विभाग, किशोर मडगुलवार जिल्हा सचिव मनसे, राज वर्मा, संदीप पटेल, वर्षा भोमले, मंदा कहाडे, शिवराज चौहान मनसैनिक उपस्थित होते.

