
पारशिवनी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पारशिवनी तालुक्यातील मेहंदी येते आदरणीय, विजय मेश्राम सामाजिक कार्यकर्ते यांच्या राहत्या घरी, बुद्ध भीम गीतांच्या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम दिनांक-08/04/2025 रोज मंगळवार ला मोठ्या उत्साहात पार पडला, सर्वप्रथम विश्वाला शांतीच्या संदेश देणारे महाकारूणी तथागत भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बहुजनाचे उद्धारक, महामानव प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन गीत सादर केले जाहीर सत्कार करण्यात आला, यावेळी विदर्भ उपप्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे शाहीर अरुण मेश्राम, शाहीर गणेश मेश्राम, शंकर मोतकर, दिलीप मेश्राम, बॅन्जो मास्तर रुपेश सोमकुवर, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, गायक चंद्रभान मेश्राम, दिनेश देशपांडे, गायिका नीलकमल गोंडाने, कार्यक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते विजय मेश्राम, गावातील नागरिक गायक शाहीर कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते..














