मूलचेरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : तालुक्यातील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मथुरानगर येथील श्री.सार्वजनिक बासंती माता पूजा कमिटी द्वारे चैत्र नवरात्री निमित्त बासंती पूजेचे आयोजन करण्यात आले. या बासंती पूजेला आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थिती राहून विधिवत पूजा करून दर्शन घेतले.यावेळी मंडळाकडून काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. त्यावेळी कंकडालवारांनी कार्यक्रमाला वर्गणीही देण्यात आली.
त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख शांती समृद्धी लाभोयसाठी माँ काली माताकडे प्रार्थना केली. दर्शन दरम्यान काँग्रेस नेते कंकडालवार यांनी येथील स्थानिक समस्या जाणून घेतले आहे.
यावेळी आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,आविसंचे तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा, अभिजित चक्रवर्ती, सुकदेव ढाली,अखिल रॉय,राजू विश्वास,समीर मंडल, वरूण वैद्या,विपुल मंडल, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गेसह स्थानिक आविसं, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

