तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – दि. 14 एप्रिल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, संविधानाचे मूल्य, अधिकार प्रत्येकाने जाणून घेऊन आपापली जबाबदारी पार पाडावी. प्रत्येकाने देशाच्या प्रगतीसाठी काम करावे.
याप्रसंगी तहसीलदार विजय पवार यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

