मीरा-भाईंदर पालिकेच्या माजी सहाय्यक आयुक्तांना एक लाखाचा दंड
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी,ठाणे
8104170564
भाईंदर, दि. १४ बेकायदा बांधकामे वाचवण्यासाठी केलेला खटाटोप मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त व तत्कालीन जनमाहिती अधिकारी कांचन गायकवाड यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत योग्य माहिती न पुरवता बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्य माहिती आयुक्त शेखर चन्ने यांची दिशाभूल करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चन्ने यांनी याची गंभीर दखल घेऊन कांचन गायकवाड यांनच्यावर प्रशासकीय कारवाई करून त्याचा अहवाल सहा महिन्यांत सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच एक लाखांचा दंड लावण्यात आला आहे.कारवाईमुळे मीरा-भाईंदर महापालिकेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

