उमरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विक्रम देशमुख यांच्या संकल्पनेतून दरवर्षी घेण्यात येणारी निबंध स्पर्धा आज संस्थेच्या उमरी येथील गिरीष देशमुख गोरठेकर, विद्याभारती ज्यु. कॉलेज येथे घेण्यात आली. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवाला. या निबंध स्पर्धेस नुतन विद्यालयाचे मा. प्राचार्य ए.एस.जाधव सर यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे निबंध परीक्षण करून त्यांचा निकाल व बक्षीस वितरण दि. 1 मे रोजी वितरीत करण्यात येतील.
या स्पर्धे वेळी मुख्याध्यापिका सौ. स्वाती वचेवार, प्राचार्य विश्वजित देशमुख,मु. अ. एस. एन. सुरकूटवार,मुख्याध्यापक एस.आर. हिवराळे, मोगल आवेज बेग, तिजारे के. ए., कवळे जी.एस., सूर्यवंशी, रमेश हैबते सा.न्या. वि.जिल्हा उपाध्यक्ष, दिगंबर इंगळे मा. सरपंच तथा ग्रा. प. सदस्य तळेगाव आदी जण उपस्थित होते.

