प्रेरणा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा वर्गाला नियमितपणे सुरुवात.

0
102

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – गडचांदूर- ग्रामीण भागातील विध्यार्थी नियमितपणे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून ते विविध स्पर्धात्मक परीक्षा देत असतात.परंतु मार्गदर्शन व नियोजनाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी अनेक अडचणींना समोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूरच्या वतीने व आर्यभट्ट अकॅडमी नांदेडच्या सहकार्याने प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयात नियमितपणे स्पर्धा परीक्षा वर्गाला दिनांक 10 एप्रिल पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. या स्पर्धा परीक्षा वर्गाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशाप्रकारे करावी. विविध स्पर्धा परीक्षांना समोर जात असताना त्याचे नियोजन कसे करावे याबद्दल तज्ञाकडून नियमितपणे मार्गदर्शन होत आहे.बरेच विद्यार्थी बारावीनंतर चार-पाच वर्षांचे अभ्यासक्रम पूर्ण करून स्पर्धा परीक्षांकडे वळतात. त्यामुळे त्यांची तयारी उशिरा सुरू होते व पुढे परत चार-पाच वर्षे अभ्यासात गेल्याने ते लवकर यश संपादन करू शकत नाहीत. या स्पर्धा परीक्षांची तयारी दहावी, बारावीपासून केली तर लवकर यश मिळवणे शक्य होते. असे प्रतिपादन डॉ.राजकुमार मुसणे यांनी केले.त्यामुळे दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा महाविद्यालयात येऊन स्पर्धा परीक्षा वर्गाचा लाभ घ्यावा. या स्पर्धा परीक्षा वर्गामध्ये गणित, बुद्धिमत्ता,मराठी व्याकरण व सामान्य अध्ययन यासारखे विषय स्पर्धा परीक्षेतील तज्ञ व्यक्तीकडून शिकविण्यात येत आहे. तसेच पोलीस,अग्निवीर व आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज सकाळी 6 वाजता नियमितपणे फिजिकल चे मार्गदर्शन होत आहे. स्पर्धा परीक्षा वर्ग हे सकाळी 8 ते 11 यावेळी दरम्यान महाविद्यालयात होत असून याचा लाभ सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी, नुकतीच दहावी,बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी व व परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा.असे आव्हान प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय तथा आर्यभट्ट अकॅडमी यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here