तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक मिरालवार
8830554583
अहेरी तालुक्यातील मौजा – कोडसेगुडाम (कमलापुर) येथील कांकल हेल्पु पेन (देवी) च्या वार्षिक जत्रा (पेन काहसळ) संपन्न झाला.
सदर जत्रेत माजी पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम आणि त्यांची अर्धांगिनी डॉ. मिताली आत्राम यांनी उपस्थीत राहुन, देवीचा पुजा करुन, देवीचा आशीर्वाद घेतलेला आहे.
कोडसेगुडाम येथील कांकल हेप्लू देवीचा वार्षिक जत्रा (काहसळ) हे अनेक वर्षापासून आयोजन केला जात आहे. या जत्रेत कमलापुर, ताटीगुडाम, कोटालगुडाम, बिमारामगुडाम, आसा, नैनेर, नैनगुडा, कोरेपल्ली, कवटाराम, कप्पेवंचा, दमरांचा, भंगारामपेठा सह कोडसेगुडाम परिसरातील नागरीक येऊन, देवीचा पुजा करात असतात.
यावेळी जात्रेत उपस्थित – कमलापुरचे माजी सरपंच – संबय्या करपेत, प्रा. दुर्गे सर, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अहेरी तालुक्याचे अध्यक्ष – नागेश मडावी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव – बालाजी गावडे, मलाय्या सकाटी – पुजारी/पेरमा, तिरुपती मडावी, सुनील नैताम, सोमय्या सकटी, शंकर आत्राम, बापू कुळमेथे सह कोडसेलगुडाम आणि परिसरातील नागरीक उपस्थित होते.

