कोपरगाव तालुका प्रतिनिधी
नवनाथ उल्हारे
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या जयंती उत्सवा मध्ये सुरेंद्र थोरात जिल्हा अध्यक्ष (A) व अनिल भाऊ ननावरे कोपरगाव तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. व तसेच यासाठी चास नळी गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच सुनीताताई बनसोडे व नानाभाऊ बनसोडे यांच्या हस्ते ही प्रतिमेची पूजा करण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी चास नळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जयंतीनिमित्ताने सचिन चांदगुडे डारेक्टर (सहकारी साखर कारखाना कोळपेवाडी). पंडितराव चांदगुडे (गोदावरी विकास )सोमनाथ अण्णा चांदगुडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कथेवर आपले मनोगत व्यक्त केले. या जयंती उत्सवा निमित्ताने चास नळी गावचे भीमसैनिक आयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमा चे सुत्र संचालन ज्ञानेश्वर धेनक यांनी केले तसेच गावचे उत्कृष्ट पोलीस पाटील प्रकाश शिंदे व श्रीरंग चांदगुडे जिल्हा उपाध्यक्ष. व मनीष गाडे संजीवनी साखर कारखाना कोपरगाव व्हा. चेअरमन यांच्याही हस्ते प्रतिमेची पूजा करण्यात आली. या जयंती मध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेची गावातून भव्य दिव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली व महाप्रसाद करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. जयंती उत्साहात कैलास धेनक. मधुकर धेनक. भागिनाथ धेनक. महेंद्र भाऊ जोंधळे. सतीश आहेर. डॉ.पाटील. अशोक माळी. प्रमोद अण्णा लबडे. विनायक गाडे. रावसाहेब चांदगुडे. पवन कुमार चांदगुडे. कैलास माळी . भाऊसाहेब माळी.कमलाकर चांदगुडे. बापू कासोदे. मुन्नाभाई शेख. व धेनक सहपरिवार सह उपस्थित होते.

