मृत व्यक्तिबाबत ओळख पटविण्याचे आवाहन

0
77

चंद्रपूर – दि. 15 एप्रिल : 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान रेल्वे स्टेशन बल्हारशाह येथील ड्यूटीवर असलेल्या कर्मचा-याने कळविले की, रेल्वे स्टेशन माजरी येथील प्लॅटफॉर्म वर एक अज्ञात पुरुष वय अंदाजे 50 वर्ष हा मृत अवस्थेत आढळून आला आहे. या नमुद अनोळखी पुरुषाचे नाव, गाव, पत्ता व नातेवाईक यांचा शोध घेण्याकरीता व ओळख पटविण्याकरीता पोलिसांनी आवाहन केले आहे.
अनओळखी मृताचे वर्णन : उंची – 5×6 फुट, रंग- सावळा, बाधा-सडपातळ, केस काळे पांढरे, चेहरा-लांब, नाक – सरळ, डोळे – अर्धवट उघडे, दाढी मिश, पिवळया रंगाचा बंगाली कुर्ता, पांढरे रंगाच्या पायाजामा, गळयात माळ,पांढरा रंगाचा गम्छा.
नमुद अनोळखी मयत इसमाचे वरील प्रमाणे वर्णन असुन सदर मयतास कोणी ओळखत असेल व त्याचे नाव, गाव, नातेवाईकाना ओळख असेल तर पो स्टे. वर्धा मो. 7499967957 व तपासी अमलदार मो.नं 9822856786 या नंबर वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here