माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवारांनी जखमींची रुग्णालयात जाऊन घेतली भेट
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपूरी तालुक्यातील नांदगाव येथील तिघांवर १२ एप्रिल रोजी बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. यामध्ये देवेंद्र नानाजी पिलारे वय ३७ वर्ष, प्रफुल राजेश्वर सहारे वय २७ वर्षं, ओनम प्रकाश सोंदरकर वय १८ वर्ष हे जखमी झाले होते.
ह्या तिघांनाही ब्रम्हपूरी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असल्याची माहिती माजी मंत्री, काॅंग्रेसचे विधीमंडळ गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना मिळताच त्यांनी सदर रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली व घडलेल्या घटनेबाबत माहिती जाणून घेत हल्लाखोर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना करणार असल्याचे सांगितले. सोबतच यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या इतर रुग्णांची देखील त्यांनी यावेळी भेट घेत प्रकृतीची विचारपूस करीत काळजी घेण्यासाठी सांगितले. त्यानंतर रुग्णालयाची पुर्ण पाहणी करून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांबाबत माहिती घेतली.
सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे हे माझे आद्यकर्तव्य असुन रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या सर्व रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार मिळावेत यासाठी त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले. रुग्णालयात रुग्णसेवेच्या संदर्भाने कामचुकारपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात येईल असे देखील त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रितम खंडाळे, डॉ.श्रीकांत कामडी, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी नगरसेवक डॉ.नितीन उराडे, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके यांसह अन्य उपस्थित होते.

