पैंजनाचा नाद तुझ्या
कानी माझ्या घुमतो ग
छुमछुम करण्यात
जीव माझा रमतो ग।।१।।
नाद तुझ्या पैंजनाचा
वेड लावी हळूहळू
जसं वाहे पाटाचं ग
पाणी जाते सुळुसुळू।।२।।
गोड तुझे ग पैंजण
जीव होई कासावीस
तुझ्या शिवाय ग राणी
नाही जात कधी दिस।।३।।
जीव लागतो भेटीला
ओढ वाटते मनाला
भेट घेण्या तू सख्याची
देना वचन आम्हाला।।४।।
हुरहुर लागे राणी
तुझ्या ग मिलनाची
स्वप्न होऊन येशील
तूच परी ग स्वप्नाची।।५।।
तीच चांदणी रात्रही
वाजे मनात पैंजण
भास तुझा सभोवार
होतो मोहीत ग क्षण।।६।
जादू तुझ्या ग नजरेची
करी घायाळ मनाला
तुझा हात येता हाती
अर्थ येई जीवनाला।।७।।
ओढ तुझी ग लागली
जशा लाटा समिंदर
मन माझे ही झुरते
आता लागे हुरहुर।।८।।
राधा होऊन येशील
तुझा कृष्ण घन निळा
सखे तुझ्या पैंजनाचा
छान वाजे खुळखुळा।।९।।।
कवयित्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

