दुडू दुडू चाल
माझ्या चिमुकलीची
गोड गोड बोल
माझ्या सोनुलीची
नुकतीच लागली
ती चालायला
अवखळ चालत
लागली पडायला
घातले गं तिला
पैंजण पायात
मग मुद्दाम चाले
छुम छुम करत
चालण्याचा तिला
लागला चाळा
तिच्या चालण्याचा
आम्हाला लागला लळा
पैंजणाच्या घुंगराची
सवय झाली कानाला
छम छम छम करत
खुणावू लागली आम्हाला
पैंजण पायात
दिसतात छान
मुलीचा असतो
घरात मान
कवयित्री रेखा डायस
गोवा

