प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पाखरांची शाळा

0
52

सायंकाळी नदीकिनारी
भरते शाळा पाखरांची
दाट दाट होता सावल्या
येते ऐकू फडफड पंखांची …

नदीकाठी कितीक पक्षी
थवेच थवे जमती सारे
पाण्यात प्रतिबिंबांचे
जणू चित्र रेखाटती नवे ….

हळूहळू येती पुढे जाती मागे
हा विसावा का हा मेळा
बघती इकडे बघती तिकडे
सोबतीचा आनंद सोहळा …

नाही एकटे असते कोणी
बरोबरीने उडती बसती
पसरताच काळोख सारा
घरट्यात परत ते फिरती….

कवयित्री गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here