सन्मानाची झालर जशी
आहे भारत देशात विपुल
म्हणूनच मरेपर्यंत इथे
नाते होतात सुंदर सफल
आई-वडील आजी-आजोबा
नात्यांचे सुंदर रूप वेगळे
यानंतरच येतात अनेक नाती
गुंफून एकमेकांना सगळे
भाऊ बहिणीचे नाते प्रेमाचे
त्यात असतो आनंदाचा गोडवा
काका काकू मामा मामी यांच्या
प्रेमाच्या पुढे कोणताच नसतो तोडवा
एका धागेत गुंफलेली
नाती आता होत आहे विभक्त
जिथे तिथे पहा नात्यात जशी
दूर होऊन समजतात नाती आहे सशक्त
रंजना भैसारे, नागपूर

