तुमसर शहरामध्ये सट्टा बाजार फार जोमात

0
21

पोलीस उपविभागीय अधिकारी पांडुरंग गोफने चे मार्गदर्शनात पोलिसांची टीम ने धाड मारली

डॉ. सुखदेव काटकर तालुका प्रतिनिधी तुमसर – शहर चे हनुमान नगर मध्ये मुख्य सट्टा बाजाराच्या आका च्या अड्ड्यावर पोलीस धाड घालण्यात आली. काही आरोपी अटक झाली आणि काही आरोपी फरार झाली. ही कारवाई दिनांक 18/ 4 /2025 ला संध्याकाळी चे सुमारास धाड घालण्यात आली. या धाडीमध्ये एक लाख वीस हजार च्या मुद्दे सहित जप्त करण्यात आले. या साहित्यात मोबाईल ,प्रिंटर, कॅल्क्युलेटर, हिशोबाचे रजिस्टर, काही आकडे लिहिलेले दस्तावेज सापडली. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये योगेंद्र देविदास येळणे (37) राहणार राजेंद्र नगर, अनिल ताराचंद हेडाऊ (48) राहणार सरदार नगर,निलेश शिवकुमार साठवणे 32 राहणार गांधी वार्ड ,विजय गंगाधर रामटेके 45 राहणार गांधी वार्ड, राजेश डोमाजी मदनकर 49 हनुमान नगर ,संजय हंसराज साठवणे 32 गोवर्धन नगर आणि गोपाल बार ई हनुमान नगर हे सर्व तुममस शहरातील रहिवासी आहे .ही पोलीस कारवाई तुमसर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफने यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुधे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम, हेट कॉन्स्टेबल भोंडेकर ,रवी आडे ,उमेश सारवे हे पोलीस कर्मचारी धाड मारण्यात सहभागी होते. पुढील तपास तुमसर पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक विजय पंचबुधे करीत आहे. तुमसर शहरांमध्ये कितीतरी वर्षापासून हे सट्टा बाजार चे कार्य सुरू आहे पण एवढी मोठी कारवाई ही पहिल्यांदाच झाली .असे आश्चर्य लोकांना वाटत आहे. आता पुढची कारवाई काय होतो ते लोकांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here