
ग्रामजयंती पर्वावर श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगरचा उपक्रम
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील श्रीगुरुदेव सेवा मंडळच्या वतीने दिनांक 25 एप्रिल ते 4 मे 25 पर्यंत 10 दिवशीय बाल संस्कार व जीवन शिक्षण निवासी शिबिराचे आयोजन केले आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राचे अधिक्षक अभियंता मा.दिलीप सराग उदघाटक म्हणून लाभले होते. उपस्थित मान्यवराच्या हस्ते दिप प्रज्वलन व अधिष्ठानाला व प्रतिमेला माल्यार्पण करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष रामदास तुमसरे लाभले होते. शिबिराचे मुख्य मार्गदर्शक म्हणून भूवैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडीचे संचालक आदरणीय सुबोधदादा उपस्थित होते. प्रमुख अतिथी अविनाश आंबेकर सामाजिक कार्यकर्ता, चंद्रपूर ,व्यसनमुक्ती कार्यकर्ता मारोती साव, चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र सहकारी पत संस्था, ऊर्जानगरचे सचिव अभियंता चेतन वानखेडे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सविताताई हेडाऊ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात सविताताई हेडाऊनी मंडळाच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला. जीवन शिक्षण शिबीर हा मंडळाचा महत्वाचा उपक्रम आहे. दि 15 एप्रिल 2015 ला सदर शिबिराची सुरुवात केली होती. राजेंद्र पोईनकर व संच सहभागी कलावंत तबलावादक बंडू कुळमेथे, सिंथेसायझर चित्राश बारापात्रे, निकुंज भोयर, प्रणित नीटचेन्नामेंटला, गायक देवेशी गेडाम, हनुमान सरवदे, आहान रामटेके, यश कावळे, माहित नीटचेन्नामेंटला यांनी स्वागतगीत सदर केले.
पाश्च्यात्य संस्कृतीत बाल संस्कार जीवन शिक्षण शिबीर महत्वाचे आहे. बालवयात झालेले संस्कार जीवनभर उपयोगी पडतात, शिबिराच्या माध्यमातून मुलांना जीवन जगण्याचे ज्ञान मिळते. संस्कार ही आयुष्याची शिदोरी आहे असे मत कार्यक्रमाचे उद्घाटन दिलीप सराग यांनी व्यक्त केले. समाजात प्रचार करून शिबिराची संख्या वाढविणे गरजेचे आहे. सुसंस्कार शिबिरातून आपली उत्तम ग्राम संस्कृती टिकविण्यासाठी चालना मिळत असते. मुलामध्ये बालवयातच स्वावलंबन, स्वयंमशासन व स्वयंपूर्णतः गुणांची वाढ व्हावी शालेय जीवनातून लुप्त झालेले जीवन शिक्षण मुलांना मिळावे याकरिता विविध भागात सदर शिबिराचे आयोजन करीत असतो असे प्रतिपादन मुख्य मार्गदर्शक मा.सुबोधदादा यांनी आपल्या भाषणातून केले.
अंध अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अविनाश आंबेकर यांनी आधुनिक मोबाईलमुळे मुलावर झालेले परिणाम विषद केले. श्री गुरुदेव माणसाची ओळख ही तो किती संस्कारी आहे यावरून होते असे चेतन वानखेडे यांनी सांगितले. व्यसनमुक्ती प्रचारक मारोती साव यांनी समाज व्यसनमुक्त व्हावा असे म्हटले. शिबिरार्थी याच्या पालकांनी वारंवार आपल्या पाल्याला भेटून शिबिरात व्यत्यय आणू नये असे मंडळाचे माजी अध्यक्ष प्रशांत दुर्गे यांनी शिबिराचे नियम समजवून सांगताना आवाहन केले. रामदास तुमसरे यांनी अध्यक्षीय भाषण केले. ते पुढे म्हणाले की पालकांनी मुलाची काळजी करू नये, आम्ही काळजी घेतो.विविध भागातून आलेल्या 40 मुला मुलींनी उदघाटन प्रसंगी प्रवेश निश्चित केला आहे.संपूर्ण शिबिरार्थ्याला बुक व पेन देण्याकरिता नितीन मुरली राव सामाजिक कार्यकर्ते यांनी आर्थिक सहयोग दिला.
जीवन शिक्षण शिबिरात अध्ययन मध्ये सामुदायिक ध्यान व प्रार्थना, ग्रामगीता पठण, जीवन शिक्षण, विविध प्रकारचे तत्वज्ञान, सेवा मंडळाचे कार्य, थोर पुरुषाचे जीवन चरित्र शिकविले जातात. मैदानी व्यायामाच्या प्रकारात योगा व प्राणायाम, सूर्यनमस्कार, मनोरे, लाठी काठी, ढाल तलवार, कराटे इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे औषधी तयार करणे शिकविल्या जाते.
सूत्रसंचालन मुरलीधर गोहणे यांनी केले तर आभार वैशाली डूडूरे यांनी मानले. शेवटी राष्ट्रवंदनेनी कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमानंतर शिदोरी काल्याचा सर्वांनी आस्वाद घेतला असे देवराव कोंडेकर यांनी कळविले आहे.














