prabodhini news logo
Home नागपूर प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार

0
129

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – दिवसा मागून दिवस जाहला येती न सुखाचा क्षण कसा हा जीवनाचा लपंडाव आहे हा जगायचा असतो फक्त आणि फक्त आपल्याच विचाराच्या सग, हो रोजच्या या जीवन प्रसंगी दिवस तर सारखाच असतो फक्त त्याला नावे महिने आणि तारीख ही निश्चित केली आहे नाहीतर सूर्य उगवतो तर सकाळ होते व रात्र झाली की अंधार पडतो मग हा प्रश्न पडला की यांच्यात बदलाव कसा करायचा हा बदलाव कधीच कोणीही करू शकत नाही तर तो आपल्यालाच करावा लागतो कारण पृथ्वीतला वर जन्म घेतल्यानंतर जीवन रुपी नावेमध्ये अनेक बदलाव होत असतात आणि काही आपल्याला करावे लागतात लहानपण यौनावस्था आणि वृद्धावस्था आहे तर निसर्गाची देण आहे पण इथे जगण्यासाठी शिक्षण घेणे ,व्यापार करणे, नोकरी करणे ,हे आपल्या छाती असते आणि आपल्या करणाऱ्या कामामुळेच आपली लायकी आखली जाते म्हणजे समाजात त्या प्रकारची छवी तयार होत असते .हे तर झाले समाजासाठी पण आपल्या या कार्यामुळे जी स्वाभिमानाची छवी स्वतःचीच तयार होते .आणि निसर्गाने प्रत्येक व्यक्तीमध्ये एकसारखे रंग भरलेले आहे. फक्त दोन व्यक्ती तयार केले आहे स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरचनेप्रमाणे प्रकृतीने दोघांनाही शरीर मनाने धष्टपुष्ट बनविले आहे काहीची आपल्या मेहनतीने समाजात नावाची ओळख होते .तर काहींचा आपल्या बुद्धिमत्तेने पण स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार आपल्यालाच बनावे लागते हे निश्चित आहे कारण जिथे स्वतः विचार करणे सोडले तर तिथे व्यक्तीला दुसरा कोणी आपला प्रभुत्व गाजवत असतो. म्हणून थोड्या अडथळे येतील पण आपल्या जीवनाचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून म्हटल्या जाते अहम ब्रह्मस्मि होणाऱ्या नुकसान भरपाई चा जिम्मेदार दुसऱ्याला दोष न देता स्वतःलाच जिम्मेदार ठरविले तर त्या कार्याच्या तळा गाळापर्यंत जाऊन कार्य स्वतःच पूर्ण करू शकतो..

लेखिका रंजना भैसारे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here