गडचिरोली – दि. ३० : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या दिनानिमित्त गुरुवार, दि. १ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता पोलिस मुख्यालयाचे कवायत मैदान, गडचिरोली येथे मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम होणार आहे. राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात येईल.
यासोबतच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अहेरी येथे आमदार धर्मरावबाबा आत्राम, उपविभागीय कार्यालय चामोर्शी येथे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, तहसील कार्यालय आरमोरी येथे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते तर इतर उपविभागीय व तहसील कार्यालयात संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.

