दुर्गम भागातील नागरिकांसाठी दिलासा – समाज कल्याण विभागाचा ‘आपला मित्र’ व्हाट्सअप सेवा सुरू

0
71

गडचिरोली – दि. ३०: जिल्ह्याच्या दुर्गम भौगोलिक परिस्थितीचा विचार करता समाज कल्याण विभागाने जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘आपला दोस्तालू/आपला मित्र’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत विभागाने 9423116168 हा व्हाट्सअप क्रमांक सुरू केला आहे. नागरिकांना योजनांची माहिती, कागदपत्रांसंबंधी मदत, शासकीय सुविधांची माहिती, तसेच अडचणी व तक्रारी यासाठी थेट वरील व्हाट्सअप क्रमांकावर संदेश पाठवता येईल.
सिरोंचा, भामरागड, इटापल्ली, कोरची यांसारख्या अतिदुर्गम भागांतील नागरिकांना आता समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती घेण्यासाठी किंवा तक्रारी नोंदवण्यासाठी जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज नाही.
या उपक्रमामुळे दूरदराजच्या भागातील नागरिकांचा वेळ, पैसा आणि प्रवासाचे श्रम वाचणार असून, समाज कल्याणाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळण्यास मदत होणार आहे.
‘आपला मित्र’ ही सेवा समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहोचवण्याचा एक अभिनव प्रयत्न असल्याचे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here