संस्कृतीची शान आणि महाराष्ट्र माझा बहारदार।
शिवरायांचा अभिमान आणि सह्याद्री कुशीत गड किल्लेदार।
मराठी माणूस कष्टाळू आणि उद्यमी शिलेदार।
लावणीचा ठसका रंगतो आणि भजन बहारदार।
सणावारांची रंगत न्यारी आणि माणुसकीची भरमार।
गणपतीच्या आरतीत गुंजतो आणि फुलतो संस्कार।
मराठ्यांचे साम्राज्य आणि अभिमान अपरंपार।
शूरवीरांची खाण आणि गर्जा जयजयकार गर्जा जयजयकार।।
उर्मिला सयाजीराव दुरगुडे
अकोले, अहिल्यानगर

