
महाराष्ट्र आहे राज्य असे
जिथे दिसते अशी संस्कृती
देते अशी साक्ष आठवणी
इतिहास वारसा जपती
जय जय महाराष्ट्र माझा
जपू त्याच्या रूढी परंपरा
खाणे पिणे पोषाख येथील
घाली भुरळ ती चराचरा
भूमी संतांची असे वीरांची
स्वराज्य निर्मात्या शिवाजीची
गडकोट किल्ले राजवाडे
शोभा अनेकशा मंदिरांची
नद्या नाले आणि ओढ्यातून
वाहे निर्मळ जल डोंगरी
येती दिसून पर्वतरांगा
जलधारा उतरी भुवरी
असे शेती समृद्ध संपन्न
व्यवसाय दिसती विभिन्न
येथे दिसे भावना ऐक्याची
कधी नसे कोणी येथे खिन्न
लाभे समुद्र किनारा असा
जणू नटली ही वसुंधरा
हिरवाई असे साज नवा
सुखी लोक कसे घराघरा
भरजरी फेटा डोईवर
नऊवारी शालू असे शान
नथ नाकात ती मोतीयांची
असे भगव्या पताका मान
अनिता मधुकर भोई
कुरूंदवाड (कोल्हापूर)















