तुझ्या डोळ्यात पाहिला
रातराणीचा सुगंध
ओंजळीत मावेना
तुझे कस्तुरीचे अंग
तुझा ओलेता वसंत
रोज चोरून पहिला
माझा उनाड ग्रीष्म
तुझ्यासवे अंकुरला
प्रेमाचे देऊ नका
नाव याला कोणी
चंद्रासवे विझलेली
एक स्वप्न कहाणी
प्रित तुझी माझी
व्यक्त कधी झाली नाही
अबोल प्रेमाची भाषा
तुला कळलीच नाही
सांजावला सूर्यास्त
मावळला चंद्रमा ही
अश्रूंसवे वाहून गेली
प्रीत तुझी माझी ही
कवी: अमोल निरगुडे
जि. ठाणे

