प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – जय जय महाराष्ट्र माझा

0
90

एक मे एकोणीशे साठ
सुरू झाला महाराष्ट्राचा थाट
महाराष्ट्राची सारी गर्जली प्रजा
जय हो,जय हो महाराष्ट्र माझा
नेहरूंनी लादली त्रिराज्य योजना
विदर्भासह महाराष्ट्र करताना
सौराष्ट्रासह गुजरात निर्मिला
तर केंद्र शासित केलं मुंबईला
बापटांनी लढ्यास प्रारंभ केला
देशमुखांनी तर राजीनामा दिला
आचार्य नी काॅम्रेड एकत्र झाले
समाजवाद्यानाही संघटित केले
हाणून पाडण्या त्रिराज्य योजना
संप करावा लागला मुंबईकरांना
मोरारजींनी मग गोळीबार करविला
अन सर्वच समाज, एकत्र झाला
प्रयत्न सर्वच फळास आले
१०६ बलिदान सार्थ जाहले
मुंबई सह महाराष्ट्र सम्मत झाला
संघर्ष समाजवाद्यांचा कामी आला
नेहरू, देसाईंवर करीत मात
संयुक्त महाराष्ट्र झाला निर्मित
शिवरायांची जणू राखली शान
महाराष्ट्र आपला खरेच महान
एक मे एकोणीशे साठ
सुरू झाला महाराष्ट्राचा थाट
महाराष्ट्राची सारी गर्जली प्रजा
जय हो,जय हो महाराष्ट्र माझा

नूतन वाघमारे गायकवाड लोणंद
सातारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here