prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – कामगार दिन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – कामगार दिन

0
133

श्रमिकांचे कष्ट लक्षात घेऊन
त्याचा जीवनावरील परिणाम जाणून
दरवर्षी 1 मे रोजी जगभरात
पाळतात ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’.

80 हून अधिक देशांत
कामगारांच्या कष्टाच्या गौरवार्थ
19व्या शतकाच्या जवळ जवळ
झाली सुरू एक युनियन चळवळ.

सोशालिस्ट काँग्रेस जे मार्क्सवादी इंटरनॅशनल
केला एक महत्वाचा ठराव मंजुर
कामगारांच्या हितार्थ होता तो सादर
8 पेक्षा जास्त तास त्यांनी न करावे काम.

1 मे हा महाराष्ट्र दिन भारतात
कामगार दिन म्हणूनही सम्मत.
श्रमिकांमुळेच उत्कर्ष औद्योगिक क्षेत्रात
साजरा हा जणु सण, राष्ट्रीय सुट्टी कामगारांस देत.

डाॅ. सौ. स्मिता एस. मुकणे
ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here