prabodhini news logo
Home कोपरगाव अंकुश अहिरे यांनी लग्नात सापडलेले रक्कम व दागिने प्रामाणिकपणाने परत केले…

अंकुश अहिरे यांनी लग्नात सापडलेले रक्कम व दागिने प्रामाणिकपणाने परत केले…

2
672

कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677 – संपूर्ण माहिती अशी की सोमवार दिनांक 5/ 5/ 2025 रोजी कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील संतोष अंबादास परहे यांची कन्या अंजली व अभिजीत यांचा शुभविवाह श्रीराम मंगल कार्यालय चासनळी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या लग्न कार्यासाठी मनोरंजनासाठी सप्तशृंगी बँड दहिवडी हा आलेला होता. व तसेच या लग्न समारंभात बँड गाडी ड्रायव्हर अंकुश अहिरे यांना लग्नात सापडलेले दागिने व काही रक्कम यांनी प्रामाणिकपणा दाखवून परत केले. खरोखरच एका गरीब घरातून जन्मलेला हा मुलगा त्याने आपल्या गरीबाची जाण ठेवून दागिने परत देऊन प्रमाणिकपणा दाखवल. त्याच्या या प्रामाणिकपणामुळे नव दापत्यांच्या हातून त्यांचा सत्कार करण्यात आला. व तसेच लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांनी ही त्याचे कौतुक केले. चासनळी गावातील ग्रामस्थांनिही ही त्याचे खूप कौतुक केले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here