आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने निःशुल्‍क मोतीबिंदू नेत्र तपासणी

0
90

श्री. माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूर व शालीनीताई मेघे हॉस्‍पीटल व रिसर्च सेंटर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने

माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकारातून बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील मानोरा येथे निःशुल्‍क मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्‍यात आले. श्री. माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूर व शालीनीताई मेघे हॉस्‍पीटल व रिसर्च सेंटर नागपूरच्‍या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्‍यात आले. या शिबिरातील तपासणीमध्‍ये ज्‍यांना दृष्‍टीदोष आढळून आला त्‍यांच्‍यावर नागपूर येथे शालीनीताई मेघे हॉस्‍पीटलमध्‍ये शस्‍त्रक्रिया होणार आहे.

श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेच्‍यावतीने नागपूर येथील शालीनीताई मेघे हॉस्‍पीटल व रिसर्च सेंटरच्‍या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्‍यात आले होते. बल्‍लारपूर तालुक्‍यातील मानोरा येथे १३१ नागरिकांची नेत्र तपासणी करण्‍यात आली. यातील ३६ नागरिकांवर शस्‍त्रक्रिया करण्‍यात येणार आहे. या शस्‍त्रक्रिया निःशुल्‍क करण्‍यात येणार आहे. विशेष म्‍हणजे या रूग्‍णांना चंद्रपूर येथून नागपूरला नेने व परत आणून सोडणे याची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. या शिबिराकरिता जिवनकला डोंगे, सरपंच, मानोरा, रमेश पिपरे, विजय डोंगे, दत्‍तू कुळमेथे, लहूजी पाटील टिकले, ज्‍योतीताई येलके, क्रिष्‍णा पिपरे, गजानन पिंपळशेंडे, क्रिष्‍णा गंधेवार यांनी अथक परिश्रम घेतले.

रूग्‍णांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार

शिबिरात सहभागी झालेल्‍या रूग्‍णांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे. तपासणी, मार्गदर्शन व शस्‍त्रक्रिया निःशुल्‍क उपलब्‍ध करून दिल्‍याबद्दल त्‍यांनी कृतज्ञता व्‍यक्‍त केली आहे. आतापर्यंत मुनगंटीवार यांनी ३५ हजारांवर नागरिकांवर मोफत चश्‍मे वितरीत केले व १५ हजारांवर मोफत मोतीबिंदू शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here