prabodhini news logo
Home ठाणे प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – आषाढी एकादशी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – आषाढी एकादशी

0
88

स्वर्गसुख मोठे l पंढरी वारीचे l
माऊली भेटीचे l आनंदाचे l l

गोपी चंदनाचा l टिळा कपाळाला l
तुळसीच्या माला l गळ्यात ह्या l l

विठ्ठलाचे नाव l मुखी घेत घेत l
टाळ मृदुंगात l नाचतात l l

देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढ शुक्ल पक्षातली आषाढी एकादशी.
वारकरी संप्रदायासाठी हा मोठा उत्सवाचा दिवस.लाखो वारकरी या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जातात.

हा भगवान विष्णुंच्या चार महिने निद्रा घेण्याच्या प्रारंभाचा दिवस असून हा खूप पवित्र दिवस आहे.

एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तास इतर कोणतीही पूजा करण्याची गरज नसते. तो संसार सुखाने करून आयुष्य पूर्ण जगल्यावर शेवटी श्रीमान नारायणाचे निवासस्थान असलेल्या वैकुंठास जातो ,सद्गती त्यास मिळते ,असे मानले जाते.

सृष्टीचा पालनकर्ता तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊली असल्याने प्रेमळ वारकरी भक्तीभावाने या दिवशी स्नान करून तुळशीस जल अर्पण करून उपवास धरून व्रत पालन करतात.
या दिवशी पैसे, वस्त्र, अन्न, पाणी यांपैकी काहीही दान केले जाते.

उपवासाला केळी ,संत्र, पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू , मोसंबी, द्राक्षे, अंजीर, खजुर व इतर फळे खातात.
राजगिरा लाडू , भगरीची खिचडी खातात.

उपवास सोडताना भेंडी, काकडी, सुरण, रताळी,टोमॅटो , बीट, लाल भोपळा अशा भाज्या केल्या जातात.
काही आध्यात्मिक वाचन केले जाते.

लेखिका डाॅ. सौ. स्मिता एस. मुकणे
ठाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here