prabodhini news logo
Home गोंदिया गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांची देवरी तालुक्यात आढावा...

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांची देवरी तालुक्यात आढावा बैठक संपन्न

0
141

जनतेच्या समस्या समजुन घेऊन निराकरण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश.

गोंदिया प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – तहसील कार्यालय देवरी जि.गोदिया येथे गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी देवरी, आमगांव, सालेकसा तालुक्याच्या विविध समस्या व धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या केन्दिय योजने अंतर्गत होणारे कामां बदल जाणून घेण्यासाठी तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. विकास कामांतील अडथळे, नागरिकांच्या अडचणी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी सचिव जिल्हा काँग्रेस कमिटी गोंदिया इसुलालजी भालेकर, जिल्हा परिषद सदस्य तथा तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी देवरी संदिप भाटिया, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, आदिवासी प्रकल्प अधिकारी उमेश काशीद, तहसीलदार आमगाव मोनिका कांबळे, तहसीलदार सालेकसा नरसया कोंडागुर्ले , तहसीलदार देवरी महेंद्र गणवीर, पोलीस अधीक्षक प्रवीण डांगे, पंचायत समिती सदस्य रणजीत कासम, आदिवासी काँग्रेस नेते मोतीलाल पिहदे, काँग्रेस नेते सावंत बापू राऊत, तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी देवरी सौ.सुनदा बहेकार, शहराध्यक्ष कुलदिप गुप्ता, नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, नगरसेवक शकिल कुरेशी, भुवनजी नरवरे, सौ.सुभद्रा अगडे, राजेश चादेवार, प्रदिप देशमुख, जिवन सलामे, अँड दुष्यंत किरसान, उत्तम साखरे, प्रल्हाद सलामे, रामेश्वर बहेकार, अशोक नरेटी, कान्हा कुजाम, विजय फुडें, श्यामलाल शेंडे, नरेश कुरसुगे, अविनाश टेभरे, रमेश वालदे, नरेंद्र सांडिल, सुरेन्द्र बनसोड एकनाथ राऊत, जियालाल राऊत, कैलास देशमुख, नंदकिशोर बारसे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते.

बैठकीत पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा, ग्रामविकास कामे, पिण्याचे पाणी, रस्त्यांची दुरावस्था, रोजगार हमी योजनेतील त्रुटी, रासायनिक खते, वनहक्क कायद्याचे प्रलंबित प्रकरणे, निराधार योजना, शासकीय योजनांचा लाभ अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
खासदार डॉ. किरसान यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, विकासकामांना गती द्यावी आणि प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे. “मी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या सोबत आहे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
बैठकीच्या शेवटी सर्व मान्यवरांनी एकत्र येत सहकार्याच्या भावनेतून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here