prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – श्रावण

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – श्रावण

0
88

भेगाळलेल्या भुईला
पावसाने वर्षाव केला
नवसंजीवन श्रावण महिना
त्याने जगण्यात रंग आणला….

हिरवाई धरणीला
सुंदर शालू नेसिला
जणू लावण्यवती प्रेयसी
तिने शृंगार श्रावणात केला….

क्षणात पाऊस क्षणात ऊन येते
लपाछपीचा खेळ हा
सुखदुःखाची चाहूल
सुगंधी नात्यात घेते….

कसदार सोने उगवते शेतात
भात मकई ज्वारी लावणी
श्रावणाच्या पाऊस सरींनी
छान होते ती औवणी….

होते सणांची सुरुवात
आनंदी श्रावण महिन्यात
लहान थोर आनंदी
पारंपारिक खेळ खेळण्यात…..

मज आवडतो श्रावण महिना
सजनी साथ तुझ्या असण्यात
नात्यात सुख पेरितो
काय गुपित दडलय याच्यात….

गायकवाड मनोज रामचंद्र, शहापूर जिल्हा ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here