
सदाबहार सदाफुली
बाराही महिने फुलणारी
दिसायला मोहक पण
उपेक्षित असणारी
गुलाबा सारखे
नाही तिचे लाड होत
मोगऱ्या सारखा
नाही तिचा सुगंध येत
सूर्याच्या लख्ख प्रकाशात
कुठेही वाढणारी
मनमोहक सदाफुली
वेगवेगळ्या रंगात फुलणारी
सदाबहार सदाफुली
आहे औषधी वनस्पती
गुणकारी ती मधुमेहावर
कमी पाण्यात वाढणारी वनस्पती
सदाबहार सदाफुली
सदाबहार सदाफुली
रेखा डायस, गोवा















