prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – श्रावण

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – श्रावण

0
101

पवित्र श्रावण आला
ढग आले दाटुन
पाखरे गोड गाती
फुले मळ्यात बहरती…॥१॥

पाऊस घेऊन आला
हिरवा बहर चोहीकडे
हर्ष मावेना मनात
मोर नाचे वनात …॥२॥

नटली सखी सुंदर
माहेरा जाती म्हणुन
आई कोडकौतुक करती
सुखात मी आईस सांगती…॥३॥

लेकी-सुना घरा आल्या
मंगळागौर सजली
फुगडीचा फेर धरला
पवित्र श्रावण आला …॥४॥

माळुनी गजरा केसात
लेक निघाली सासरी
आईला मारती मिठी
परत कधी पडतील गाठी…॥५॥

शुभम किरण गोरे
अकलूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here