prabodhini news logo
Home ठळक बातम्या निधीश सावरकर यांनी स्वीकारली लाॅयन्स क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे

निधीश सावरकर यांनी स्वीकारली लाॅयन्स क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे

0
125

नव्या कार्यकारिणीचे पदग्रहण थाटात संपन्न

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – नागपूर: लाॅयन्स क्लब ऑफ नागपूरचा ६९वा ‘चेंज ऑफ गार्ड’ समारंभ रविवारी एअरपोर्ट सेंटर पॉईंट हॉटेल येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. वर्ष २०२५-२६ साठी नव्याने कार्यभार स्वीकारणाऱ्या कार्यकारिणीची घोषणा यावेळी करण्यात आली.

या कार्यक्रमात निधीश सावरकर यांनी अध्यक्षपदाची, गुरसिमरन कौर यांनी सचिवपदाची तर रवि किशनपुरिया यांनी खजिनदारपदाची सूत्रे स्वीकारली. इतर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष रविंदर सिंह खुराणा, विनोद गुप्ता, सहसचिव सुनील कुहीकर, सह खजिनदार सागर शिवहरे, राजकुमार अग्रवाल, प्रकाश वाघमारे, रजनीश जैन, किशोर भैय्या, संगीता किशनपुरिया, विनित सोंधी, रमेश जसोरे, गिरीश व्यास, संजय गुप्ता, किशोर कुंजेकर, शरद जेजानी, राजेश जिंदल, चेतन मारवा, नितीन वर्मा, उमेश महतो, सतिश जैन, विजय फरकासे यांचा समावेश आहे.
मुख्य अतिथी म्हणून लाॅयन टी. व्ही. श्रवण कुमार उपस्थित होते.

यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत नव्या कार्यकारणीला करावयाच्या कामांबद्दल अवगत करून दिले. पुढील वर्षभरामध्ये सामाजिक उपक्रम, समाजपयोगी कार्य राबवण्यासंदर्भात नियोजन करण्याचे सूचित केले. रीजन चेअरपर्सन डॉ. किरण मोहता
यांनी नवीन कार्यकारिणीची औपचारिक घोषणा केली. झोन चेअरपर्सन नितीन वर्मा यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले.

गेल्या वर्षभरात सामाजिक कार्यात भरीव कामगिरी बजावणाऱ्या क्लब सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मावळत्या कार्यकारिणीचे अध्यक्ष सचिन अग्रवाल, सचिव विनोद गुप्ता यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक उपक्रमाबद्दलचा आढावा सादर केला.

नवीन कार्यकारिणी वर्ष २०२५-२६ मध्ये सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून विविध उपक्रम राबविण्यास सज्ज असून, समाजहिताचे अनेक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. क्लबचे सर्व सदस्य नवीन नेतृत्वासोबत नव्या ऊर्जेने कार्य करण्यास उत्सुक असल्याचा विश्वास यावेळी अध्यक्ष निधीश सावरकर यांनी व्यक्त केला.

नव्या कार्यकारिणीचा विशेष उपक्रम म्हणून लाॅयन्स क्लबच्या वतीने नागपुरातील विवेकानंद हाॅस्पिटॅलला व्हीलचेअर भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन मारवा, राजेश जिंदल यांनी, तर आभार सचिव गुरसिमरन कौर यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here