
कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे – कोपरगाव तालुक्यातील धामोरी गावात सालाबाद प्रमाणे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा श्री संत सावता महाराज ट्रस्टच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो. यावर्षीही तीन दिवसीय सप्ताह श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान मंगळवार दिनांक 22 -रोजी ह भ प ऋषिकेश महाराज कुयटे यांनी किर्तन रुपी सेवा दिली. बुधवार दिनांक 23 सात रोजी हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांचे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुश्राव्यरुपी कीर्तन झाले. तसेच गुरुवार दिनांक 24 -7 रोजी ह भ प निलेश महाराज पवार यांनी कीर्तनाची सेवा दिली. व शुक्रवार दिनांक 25 -7 रोजी ह भ प गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे 10 ते 12 काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमासाठी धामोरी गावातील व परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमात कोपरगाव तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार स्नेहलता ताई उपस्थित होत्या. या ट्रस्ट च्या वतीने गुणवंत विद्यार्थी व विशेष प्राविण्य मिळवलेले बांधवांचे सत्कार करण्यात आले. शेवटच्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा करणारे गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांचा सत्कार महिला आमदार स्नेहलता ताई यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी धामोरी येथील श्री संत सावता महाराज विश्वस्त संत शिरोमणी सावता महाराज भजनी संत सावता युवक मंडळ व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ हे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.















