prabodhini news logo
Home चंद्रपूर विद्यामंदिर हायस्कूल, उर्जानगर येथे सर्प विज्ञान प्रबोधन कार्यक्रम संपन्न

विद्यामंदिर हायस्कूल, उर्जानगर येथे सर्प विज्ञान प्रबोधन कार्यक्रम संपन्न

0
184

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – उर्जानगर (चंद्रपूर) : चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राच्या वसाहतीतील विद्यामंदिर हायस्कूल, उर्जानगर येथे आज सर्प विज्ञान प्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. दिलीप पवार सर, मुख्याध्यापक यांनी भूषवले होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य सहकार्यवाहक मा. पी. एम. जाधव सर यांची विशेष उपस्थिती होती.
या उपक्रमात सर्पांविषयी समाजात प्रचलित गैरसमज, त्यांचे जैविक महत्त्व, आणि आपत्तीच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थांना सर्प या विषयावर प्रबोधन करण्यात आले तसेच विषारी व बिनविषारी सापांची माहिती असलेले पोष्टर प्रदर्शनी दाखवून माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमास चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष मा. नारायण चव्हाण, उर्जानगर शाखेचे कार्याध्यक्ष देवराव कोंडेकर, मुरलीधर राठोड, शंकर दरेकर यांच्यासह शाळेतील जेष्ठ शिक्षक नरेंद्र गिरी, राजू परचाके, रतन सुरतेकर व शिक्षिका सोनमाणे, मेश्राम, कर्मचारीवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्पांविषयीची वैज्ञानिक दृष्टिकोन व संवेदनशीलता विकसित होण्यास निश्चितच मदत होणार आहे, असे मत आयोजकांनी यावेळी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here